Description
प पू स्वामी वरदानंद भारती यांनी श्रीमद्भगवद्गीतेतील दुसरा अध्याय ‘स्थितप्रत योग’ यावरील केलेले हे प्रभावी भाष्य. या अध्याचे महत्व सांगताना स्वामीजी म्हणतात “भगवद्गीतारुपी ज्ञानभांडाराचा दुसरा अध्याय हा जणू प्रदर्शनकक्ष आहे. इहलोकीच्या कर्तव्यकर्मापासून ते परमसाध्य अशा मोक्षापर्यंत साधकाला, जिज्ञासूला जे काही आवश्यक असते, ते सर्व प्रतीकरुपाने या प्रदर्शनकक्षात आकर्षकरीत्या मांडून ठेवलेले आहे. ते पाहून प्रामाणिक जिज्ञासू, निष्ठावंत साधक त्या त्या विषयाच्या सुदपदेशासाठी ओढ वाटून गीतारुपी ज्ञानभांडारात प्रवेश केल्याशिवाय राहणार नाही”
गीतेचा हा दुसरा अध्याय, अर्जुनाने जी विशेष रुपाची शंका उपस्थित केली, तिच्या निरसनार्थ आरंभतो आहे. अर्जुनाच्या शंकेचे जे मूलभूत कारण ममत्व, ते नाहीसे करण्यासाठी भगवान् श्रीकृष्ण येथे सामान्य व्यावहारिक नीतिनियमासवेच परमोच्च प्रतीचे असे तत्त्वज्ञानही थोडक्यात सांगत आहेत. येथील आत्मविषयक तत्त्वज्ञान हे जणू तत्त्वज्ञानाच्या साराचेही सार आहे. गीतेमध्ये पुढे जी अनेक विषयांची चर्चा आली आहे, ते सर्व विषय येथे या अध्यायात बीजरुपाने प्रतिपादिले गेले आहेत, असे निश्चयाने म्हणता येईल.
Reviews
There are no reviews yet.