संकेतस्थळ उद्दिष्टे
ॐ श्री 卐 ll श्रीशंकर ll निर्मोह: संयमी योगी शान्तो दान्तो विमत्सर: |सोsस्तु मे वरदो नित्यं वरदानंद भारती ||सुप्रसन्न: समाधानी निश्चयी च दृढव्रती |सोsस्तु मे वरदो नित्यं वरदानंद भारती || सज्जन हो, सप्रेम जयहरि. प्रेरकः सूचकश्वैव वाचको दर्शकस्तथा । शिक्षको बोधकश्चैव षडेते गुरवः स्मृताः ॥ सत्कर्माची प्रेरणा देणारे, अकर्म टाळण्याची सूचना देणारे, सत्याचा निर्देश करणारे, सन्मार्ग दाखविणारे, उत्तम शिक्षण देणारे व सुबोध करणारे - असे सहा जन मनुष्यासाठी गुरु समान असतात, अशा अर्थाचे एक शास्त्र वचन आहे. यातील एका गुणाने संपन्न असलेला गुरु लाभला तरी मनुष्याचे कल्याण होणे निश्चित आहे. नारदभक्तिसूत्र सांगते -मुख्यतस्तु महत्कृपयैवभगवत्कृपालेशाद्वा ॥ महत्सङ्गस्त् दुर्लभोऽगम्योऽमोघश्च । लभ्यतेऽपि तत्कृपयैव ॥अर्थातप्रेमभक्तीच्या प्राप्तिचे साधन मुख्यत: महापुरुषांच्या कृपेने अथवा भगवंताच्या लवमात्र त्कृपेने सद्भक्ताला प्राप्त होते. तथापि महापुरुषांचा सङ्ग दुर्लभ, अगम्य आणि अमोघ आहे. भगवंताच्या कृपेनेच महापुरुषांचा संश्रय प्राप्त होतो. विवेक चूडामणि यात नमूद केले आहे -दुर्लभं त्रयमेवैतद्देवानुग्रहहेतुकम् । मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुषसंश्रयः ॥अर्थातज्यामुळे भगवत्कृपा प्राप्त होते, तो मनुष्यजन्म, मुमुक्षुत्व (मुक्त […]