संकेतस्थळ उद्दिष्टे

ॐ  श्री  卐 ll श्रीशंकर ll निर्मोह: संयमी योगी शान्तो दान्तो विमत्सर: |सोsस्तु मे वरदो नित्यं वरदानंद भारती ||सुप्रसन्न: समाधानी निश्चयी च दृढव्रती |सोsस्तु मे वरदो नित्यं वरदानंद भारती || सज्जन हो, सप्रेम जयहरि. प्रेरकः सूचकश्वैव वाचको दर्शकस्तथा । शिक्षको बोधकश्चैव षडेते गुरवः स्मृताः ॥ सत्कर्माची प्रेरणा देणारे, अकर्म टाळण्याची सूचना देणारे, सत्याचा निर्देश करणारे, सन्मार्ग दाखविणारे, उत्तम शिक्षण देणारे व सुबोध करणारे - असे सहा जन मनुष्यासाठी गुरु समान असतात, अशा अर्थाचे एक शास्त्र वचन आहे. यातील एका गुणाने संपन्न असलेला गुरु लाभला तरी मनुष्याचे कल्याण होणे निश्चित आहे. नारदभक्तिसूत्र सांगते -मुख्यतस्तु महत्कृपयैवभगवत्कृपालेशाद्वा ॥ महत्सङ्गस्त् दुर्लभोऽगम्योऽमोघश्च । लभ्यतेऽपि तत्कृपयैव ॥अर्थातप्रेमभक्तीच्या प्राप्तिचे साधन मुख्यत: महापुरुषांच्या कृपेने अथवा भगवंताच्या लवमात्र त्कृपेने सद्भक्ताला प्राप्त होते. तथापि महापुरुषांचा सङ्ग दुर्लभ, अगम्य आणि अमोघ आहे. भगवंताच्या कृपेनेच महापुरुषांचा संश्रय प्राप्त होतो. विवेक चूडामणि यात नमूद केले आहे -दुर्लभं त्रयमेवैतद्देवानुग्रहहेतुकम् । मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुषसंश्रयः ॥अर्थातज्यामुळे भगवत्कृपा प्राप्त होते, तो मनुष्यजन्म, मुमुक्षुत्व (मुक्त […]

आजचे दर्शन

वरदवाणी

Calendar Day 26

पिंडज्ञान म्हणजे शरीरासंबंधीचें ज्ञान. यांत पांच कोशांचा विचार येतो. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय, असे एकाच्या आंत एक असलेले, अधिक सूक्ष्म आणि तरल होत जाणारे, हे पांच कोश आहेत. शरीर, इंद्रिये, मन, बुद्धि, यांच्या सखोल विचार या पिंडज्ञानात समाविष्ट होतो. शरीर आणि तदंतर्गत इंद्रियादि भाव हे, आचरणारा, कर्ता या दृष्टीने उपासनेचे एक महत्त्वाचें अंग असल्यानें त्यांच्याविषयीचे ज्ञान करून घेणे आवश्यक होतें. तत्त्वज्ञान या शब्दाने येथें पिंडाव्यतिरिक्त सृष्टिचा विचार केला आहे. सृष्टीची उत्पत्ति, तेथील क्रम, उत्पत्तीची मूळ प्रेरणा, उत्पत्तीचे अधिष्ठान या सर्वांचा विचार येथें येतो. पंचमहाभूतांचा विचार हा त्यांतील महत्त्वाचा भाग. हे पिंडज्ञान आणि तत्त्वज्ञान दोन्हीं जरी एक जिज्ञासू म्हणून कोणी जाणून घेतलें असलें तरी केवळ तेवढ्याने समाधान प्राप्त होत नाही.

२६