Description
From 1868 to 1962! The era of the modern saint-poet, Sadguru Shri Dasganu Maharaj! The life, poetry, and devotional songs of Maharaj were truly extraordinary. His poetic influence was vast, and he had a large following of devoted disciples. Until the very last moments, Maharaj remained dedicated to his spiritual practices. He made strong efforts to cultivate virtues such as righteousness, contentment, and virtuous living. Whatever Maharaj spoke, observed, liked, or disliked, he expressed in simple language with exceptionally melodious and graceful poems. His poetry effortlessly reached the depths of the hearts of the listeners, prompting self-reflection.
Pu Dasganu Maharaj initiated unique celebrations and preserved his traditions. Pu Swamy Varadanand Bharati continued this tradition and ensured the growth of the literary tradition of Shri Maharaj. The Shri Dasganu Pratishthan (Foundation) continues its work today as per the directives of P Pu Swami Varadanand Bharati. “Bhavamuktavali” was created to help devotees progress in their spiritual practices by reciting these transcendental poems
इ.स.१८६८ ते १९६२! आधुनिक महिपती संतकवि, सद्गुरु श्रीदासगणूमहाराज यांचा कालखंड! महाराजांचे जीवन, काव्य, कीर्तन सारेच अपूर्व होते. त्यांचा काव्यपसारा जसा विपुल तसा भक्त परिवारही मोठा. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत महाराजांनी उपासनेला दृढ चालविले. सदाचार, सन्नीती, सद्वासना यांची जोपासना करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. महाराजांना जे जे वाटले, रुचले व पटले ते ते सरळ भाषेत त्यांनी कथन केले. प्रत्येक गोष्टीतले सार घेतले. असार टाकले. “सत्य” सांगतांना समाजातील दंभाचारावर त्यांनी कठोर आघात केले. मग तेथे कोणाचीही भीडमुर्वत बाळगली नाही.
महाराज सहज बोलत ते काव्य होत असे. त्यांची अतिशय रसाळ, सोपी व प्रासादिक कविता, लावणी, ओवी वाचता वाचताच त्यांतील भावार्थ मनात आपोआप प्रगटू लागतो. हृदयात सरळ जाऊन भिडतो. मूळ अर्थ लक्षात येऊ लागतो व चिंतनाची क्रिया सुरू होते. हे महाराजांच्या काव्याचे वैशिष्ट्य आहे.
त्यांनी निरनिराळे उत्सव सुरू केले. त्यांच्या पद्धती आखून ठेविल्या. त्याच पद्धतीने सद्गुरु दासगणूमहाराजांचा कृपाशीर्वाद, पुण्याई पाठीशी घेउन ती. अप्पा (स्वामी वरदानद भारती) यांनी श्रीमहाराजाच्या काव्यपरंपरेचे, उत्सवांचे संरक्षण व संवर्धन केले. श्रीदासगणु प्रतिष्ठान आज तेच कार्य श्रीस्वामींच्या आदेशानुसार चालवीत आहे. परतत्त्वस्पर्श असलेल्या महाराजांच्या काव्यातून भाविकाला उपासनेचे महत्त्व कळून त्याचेकडून ती घडावी या हेतूने “भावमुक्तावलि” ची निर्मिती झाली आहे
Reviews
There are no reviews yet.