Description
पू. स्वामीजी ब्रह्मलीन झाल्यानंतर त्यांच्या संग्रहात काही लेखन होते, काही विखुरलेले होते. ते सारे अप्रकाशित वाङ्मय एकत्र करून त्यातील केवळ गद्य लेखनाचा हा पहिला खंड पू. स्वामीजींच्या पुण्यतिथीला प्रकाशित करण्यात आला आहे. पू. स्वामीजींनी आपले सर्व जीवन आपल्या परंपरा, आपली संस्कृती, आपला धर्म, यांच्या संगोपन-संरक्षण यासाठी व्यतीत केले. अनेक कीर्तने, व्याख्याने, प्रवचने त्यासाठी केली. संन्यासोत्तर जीवनातही हे माध्यम चालू ठेवले. त्यामुळे धर्म- संस्कृतीवरील आक्षेपांचे निराकरण करणे हे जणू त्यांचे जीवन झाले होते. त्यामुळे त्यांचे खंडण-मंडणपर लिहिलेले पूर्वीचे लेख-जे अलीकडे दुर्मिळ झाले होते ते मिळवून या खंडात संग्रहित केले आहेत.
Reviews
There are no reviews yet.