तत्त्वज्ञानाच्या आधारावर शास्त्रानें मनुष्याच्या चित्तशुद्धीसाठी योगमार्गादि साधनें सांगितली आहेत. योगाचा अर्थ आहे, चित्तवृत्ति-निरोध. वासना नियंत्रित करून चित्तशुद्धी होण्यासाठी यज्ञयागाचा उपयोग होतो.