विश्वामध्यें भासणारी विविधता ही जरी अस्थिर, पालटणारी, सापेक्ष संबंधावर आधारलेली म्हणून मिथ्या असली तरी तिच्या मुळाशी असलेलें तत्त्व मात्र स्थिर, निरपेक्ष आणि म्हणूनच सत्य असें आहे. कांहीं विद्वान, शाश्वत, त्रिकालाबाधित अंतिम असें सत्य म्हणून कांहीं आहे हेंच मान्य करीत नाहींत. पण तें योग्य नाहीं.