आपले जें सगळे आपले जुनें ठेवणें आहे. ते फार जुने आहे, वेदाइतके, महाभारताइतकें प्राचीन आहे. इतिहास संशोधकांना चक्कर यावी इतक्या पूर्वीचा हा काळ आहे, आणि त्यामुळेंच माणसाला ऐश्वर्यशाली बनविणारा हा समृद्ध ठेवा सहजासहजी ओळखता येत नाहीं. त्यासाठीं सायास केले पाहिजेत, प्रयत्न केले पाहिजेत, दक्षतेने, विवेकाने, सातत्याने श्रम केले पाहिजेत. आळस करतां कामा नये, दीर्घकालपर्यंत कराव्या लागणाऱ्या कष्टांना कंटाळता कामा नये. आंब्याच्या झाडाची फळे रोप लावताच चार सहा महिन्यांत हातीं पडत नाहीत, ५-१० वर्षें त्याकरिता वाट पहावी लागते, हे लक्षांत ठेवले पाहिजे.