ब्रह्माला पाहूं गेले म्हणजे पाहणेच नाहींसें होतें. ज्ञाता आणि ज्ञेय असें कांहीं उरतच नाहीं. मिठाच्या बाहुलीने समुद्राचा तळ शोधण्याचा प्रयत्न करावा म्हणजे जसें होईल तसेंच ब्रह्म पाहाणाराचे होतें. पाहण्यासाठी पाहणारा आणि जें पाहावयाचे ते वेगळे असावे लागतात, वेगळे रहावे लागतात. फार जवळीक सुद्धा पाहण्याच्या क्रियेला प्रतिकूल असतें. डोळ्यांत घातलेले काजळ यामुळेंच दिसूं शकत नाहीं. येथे नुसती जवळीक नाहीं तर एकरूपताच असते. तेव्हां कोण कोणाला पाहणार? “तत्र केन कं पश्येत्” असा हा पाहणेपणा गळून पडतो असें जेथें घडते, तेथें जाऊन पोचणें म्हणजेच ब्रह्माचा शोध घेणे आहे.
COPYRIGHT © 2025 श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित

