उपनिषदांमध्ये ब्रह्माचें वर्णन करतांना “यत् चक्षुषा न पश्यति येन चक्षूंषि पश्यति l तदेव ब्रह्म त्वं विद्धि ll” (केन १/६) असें वर्णन केले आहे. डोळे ज्याला पाहूं शकत नाहींत पण डोळ्याला पाहण्याचे सामर्थ्य ज्याच्यामुळे प्राप्त होतें, तें ब्रह्म आहे, असें तूं जाण असा उपदेश तेथे आहे. त्याच्याच पुढें मनानें ज्याचें चिंतन होऊं शकत नाहीं पण मनाला चिंतन करण्याचे सामर्थ्य ज्याच्या शक्तीने मिळते तेंच ब्रह्म म्हणून ओळखावे असेहि तिथे सांगितलें आहे.
COPYRIGHT © 2025 श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित

