शांत झोपेसारखे जे सहजप्राप्त असावयाचे त्या विषयांतसुद्धा बरीच दक्षता घ्यावी लागते तर जन्मजन्मान्तरींच्या अनिष्ट संस्कारांनीं विकृत झालेल्या अंतःकरणवृत्तींना, ब्रह्मज्ञानाच्या अनुभवास मुकावें लागेल, यांत कांहींच आश्चर्य नाही. स्वतःच्या जीवनक्रमांत, इंद्रियांच्या प्रवृत्तीत, अंतःकरणाच्या धारणेत, ब्रह्मज्ञानाच्या दृष्टीनें अनुकूल परिवर्तन झाल्यावांचून ब्रह्मज्ञान होणें दुरापास्त आहे.
COPYRIGHT © 2026 श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित

