मनोबोध – विवरण

350.00

श्रीसमर्थांच्या मनाच्या श्लोकावरील प पू स्वामी वरदानंद भारती यांची प्रवचने

Categories: ,

Description

“ मनोबोध ” किंवा ” मनाचे श्लोक ” हे श्रीसमर्थांनी रचलेले प्रकरण महाराष्ट्रांत आणि मराठी भाषिकांत सुपरिचित आहे. ज्याला एखादा तरी मनाचा श्लोक अवगत नाही असा मुलगा सहसा सांपडावयाचा नाहीं. पण खरी अडचण अशी आहे कीं हा उपदेश आणि आपले प्रत्यक्ष जीवन यांची कांहीं सांगड घालण्याचा प्रयत्न करावा असे आपल्या मनात येत नाहीं. संतांनी केलेल्या या उपदेशाचा आपलें जीवन सुंदर, समाधानी तृप्त आणि आनंदपूर्ण बनविण्याशीं कांही प्रत्यक्ष संबंध आहे, असे आपल्याला वाटेनासे झाले आहे. प्रस्तुत ग्रंथाच्या रूपानं मनोबोधावर सविस्तर व्याख्यान करणारे स्वामि वरदानंदभारती (पूर्वाश्रमीचे श्री. अनंत दामोदर आठवले ) हे कांहीं कोणी अरण्यवास पत्करलेले प्रपंचविन्मुख संन्यासी नाहींत. लौकिकदृष्टीने यशस्वी प्रपंच त्यांनी केला पण जीवनांत प्रपंच आणि परमार्थ हे दोन वेगळे, परस्परांपासून स्वतंत्र कप्पे आहेत असं त्यांनीं मानले नाहीं. भगवंताच्या अधिष्ठानावर खंबीरपणे उभा असलेला शाश्वत भारतीय जीवनविचार, हाच जीवनसाफल्यासाठी केवळ आधारभूत मानला म्हणजे प्रपंच आणि परमार्थ ही दोन्ही एकच होऊन जातात. जीवन धन्य होतें. याप्रकारें ज्याचे जीवन खरोखरच धन्य झालेले आहे, प्रसाद ज्याचे जीवन व्यापून राहिलेला आहे, अशा भगवत् भक्तानं केलेलें है विवरण आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मनोबोध – विवरण”

Your email address will not be published. Required fields are marked *