Description
समाजस्थैर्याच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा, सर्वांनीच विचार करावा असा आणि आज अत्यंत विपरीतपणे हाताळला जाणारा विषय म्हणजे मनुस्मृती. मनुस्मृती- संबंधाने बोलावयाचे झाले तरी चांगल्या माणसालाही चिंता वाटते, अशी आजची स्थिती आहे. आजच्या सामाजिक परिस्थितीची यथार्थ जाण ठेवून मनुस्मृतीची मूलभूत मौलिक तत्त्वे समाजस्वास्थ्याला कशी पोषक आहेत ते आपल्या संस्कृतीच्या संदर्भात सांगण्याची आवश्यकता होती. सुदैवाने ती पूर्तता करणारे व्यक्तिमत्व पूर्वाश्रमीचे प्राचार्य अ. दा. आठवले- आता स्वामी वरदानंद भारती यांच्यारूपाने आपल्याला लाभले आहे. आपल्या प्रगाढ तत्त्वचिंतनाने, समाज जीवनाच्या सर्वांगीण अवलोकनाने आणि युक्तायुक्ततेचा समग्र विचार करून बिनतोड युक्तिवादाने मनुस्मृतीचा अनुवाद आवश्यक तेथे विवरणासह त्यांनी सिद्ध केला आहे. असा हा सर्वोत्कृष्ट ग्रंथ प्रकाशित करून भारतीय समाजाच्या हाती देताना श्रीराधादामोदर प्रतिष्ठानला अतिशय आनंद वाटतो आहे. परम पूजनीय स्वामीजींच्या अनेक वर्षाच्या समाजचिंतनाचे ते फल आहे.
असा हा ग्रंथ प्रगाढचिंतनाने संदर्भसमृद्ध झाला आहे. आणि समाजाने व शासनव्यवस्थेनेही तो आवर्जून अभ्यासावा असाच आहे.
Reviews
There are no reviews yet.