Description
भजनावली” या पुस्तिकेला सायं-साधनेमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. “अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी” असेच तिचे स्वरूप आहे. त्यामुळे सहृदयतेने ती गायिली गेली तर अंतःकरणाची प्रसन्नता लाभणे सहज शक्य आहे. तशी ती साधकांना लाभावी हाच भजनावलीचा मुख्य हेतूही आहे. श्रीक्षेत्र गोरटे येथे गणुदासाश्रमामध्ये नित्यनेम म्हणून ही भजनावली गायिली जाते. इतरत्रही प्रसंगविशेषी हे भजन संगीत वा वाद्य यांच्या सहाय्याने म्हटले जाण्याची पद्धत आहे.
वृत्ति प्रसन्न होणे आणि मनाला समाधान लाभणे हे या भजनावलीचे दृश्यफल आहे. भाविकाला भगवंताला आळवण्यासाठी शब्दांची आवश्यकता असते. अंतःकरणात प्रेम आहे, उत्कंठा आहे पण शब्द गवसत नाहीत असे होते. दीनवत्सल संतांनी यासाठीच आपले वाड़्मय निर्माण केले आहे.
Reviews
There are no reviews yet.