Description
प.पू.स्वामी वरदानंदभारती (पूर्वाश्रमीचे अनंत दामोदर आठवले ) यांचे संपूर्ण जीवनच जणू हरिकीर्तन आणि भगवंताची पूजा; ही निष्काम निरलस प्रेमपूर्ण पूजा घडत असतांना प.पू.स्वामींच्या भावभावनांचे जे विविध सहजोत्कट अविष्कार व्यक्त झाले ते अविष्कारच भावार्चना. अनंत हृदयातील ओघवती, खळाळती प्रसन्न पावन अशी भावगंगा म्हणजेच भावार्चना.
प पू स्वामी वरदानंदभारती यांच्या ‘भावार्चना’ या कविता संग्रहात भक्तीची उत्कटता, प्रेमाची उदात्तता, आणि विश्वात्मैक्याची नम्रता या साऱ्यांचा संग त्यांच्या कवितांमध्ये पहावयास मिळतो. त्यांत काही स्तोत्रे आहेत, काही अष्टके, काह अभंग तर काही पदे – पोवाडेही ! पण मधुरता त्या सर्वांचा स्थायी भाव आहे. प्रासादिकत त्यांचा आत्मा आहे. बव्हंशी रचना मराठी असली तरी संस्कृत रचनांमध्येही सहजताच प्रत्ययाल येते. भावोन्मेषाला भाषा आड येत नाही. ही सारी रचना प्रत्ययकारी असून आत्मानुभवाची अभिव्यक्ति करणारी असल्यानेच विलक्षण प्रभावात्मकता तिला लाभलेली आहे. ‘अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी’ असेंच तिचे स्वरूप आहे !
Reviews
There are no reviews yet.