शरीराची रचना जाणून घेतली, शरीराचे व्यापार कसे चालतात तें कळले आणि आरोग्यशास्त्राचा अभ्यास केला तरी केवळ तेवढ्याने मनुष्य निरोगी, स्वस्थ होण्याची शक्यता नाहीं. परीक्षेपुरतें आरोग्यशास्त्राचे नियम पाठ करून आरोग्यसंपन्नता येत नाहीं. तीच स्थिति तत्त्वज्ञानाची. नित्य काय आणि अनित्य काय, टिकणारे कोणतें-मरणारें कोणतें, आपल्या हिताच्या दृष्टीने काय घ्यावे, काय टाकावे, हें कळावे, त्या दृष्टीने उत्पन्न होणाऱ्या इच्छा, आकांक्षा, वासना या पारखून घेता याव्यात म्हणून तत्त्वज्ञान उपयोगी पडते.
COPYRIGHT © 2026 श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित

