ज्याची चर्चा केली जाते, ज्याविषयी खूप बोलले जाते, वादविवाद रंगतात, ते मूळ सत्य वा तत्त्व साररूपाने खरोखरीच शब्दांच्या पसाऱ्यापेक्षां वेगळेच राहते. सगळ्या दिसणाऱ्या, भासणाऱ्या, विविधतेंत तें भेदातीतपणें एक असेंच राहते. विविधतेतील कोणत्याहि गुणाचा स्पर्श त्याला होत नाहीं. त्याचें स्वरूप वर्णनातीत असें आगळेच आहे. म्हणून तर अनुभवासाठी फार परिश्रम करावे लागतात. वरवरच्या शाब्दिक ज्ञानानें तें साधत नाहीं. खरोखरीचे समाधान प्राप्त करून घ्यावयाचे असेल, अंतःकरण सर्वदा तृप्त, शांत, प्रसन्न राहावें असें वाटत असेल तर वरवरचे उपचार त्यासाठीं पुरेसे नाहीत.
COPYRIGHT © 2026 श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित

