सारखे सारखे शोधीत गेलें म्हणजेच शोध लागतो. पुन्हा पुन्हा बोधाचे ग्रहण केलें म्हणजेच बोध होतो. एकदां ऐकून वा रोज नवें-नवें ऐकून वा वाचून मनाला बोध होत नाहीं. सगळे नीटपणे आकळत नाहीं, उलगडत नाहीं. जें ऐकले वाचले त्यावर चिंतन-मनन-निदिध्यासन सातत्याने घडले पाहिजे. “श्रुतं हरति पापानि” हा अगदींच प्राथमिक विचार आहे. खेदाची गोष्ट अशी कीं फक्त हा एवढाच विचार कार्यवाहीत आहे.
COPYRIGHT © 2026 श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित

