जिची झेप ब्रह्मापर्यंत पोचण्याची शक्यता नाहीं अशा केवळ बुद्धीचा आधार घेतला म्हणजे मन गोंधळून जाते. आंधळ्याने चित्राचे मूल्य ठरवावे, बहिऱ्याने संगीताचा सुरेलपणा निश्चित करावा, तसेच हें आहे. ब्रह्म ही तर्काने कळणारी वस्तु नाहीं. निःस्पृह जाणत्यांवर, कनवाळू संतांवर, दृढ विश्वास ठेवून त्यांच्या आदेशाचे श्रद्धेने पालन केलें तरच ब्रह्मापर्यंत पोचता येईल. मुक्त होता येईल.
COPYRIGHT © 2026 श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित

