शांत झोप हा शरीराचा नैसर्गिक असा जड विकार असूनहि हवे तसें करीन, हवा तसा वागेन, हवे ते खाईन वा खाणार नाहीं असें म्हणून चालत नाहीं. यातल्या अनेक गोष्टींमुळें झोप दुरावते आणि रात्ररात्र तळमळत काढावी लागते वा निद्रानाशाचा हा विकार टाळण्यासाठीं अधिक घातक अशा विषारी द्रव्याचा उपयोग करावा लागतो. म्हणून निद्रेचे सुख अनुभवावयाचें असेल तर जीवन हें आरोग्यशास्त्राचे नियम सांभाळून जगावें लागतें. आळस वा अतिश्रम, उपासमार वा अजीर्ण, आत्यंतिक अभिलाषा, क्रोध, चिंता, भय, शोक यांचा त्याग करावा लागतो.
COPYRIGHT © 2026 श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित

