सामान्यतः प्रत्येक मनुष्य रोज गाढ झोप अनुभवत असूनहि, ती असते तेव्हां तिची जाणीव नसते. कशी येते, आली म्हणजे काय होतें वा तिचें स्वरूप काय? याचें निश्चित वर्णन करतां येत नाहीं. ब्रह्मानंदाचे तसेंच आहे. गाढ झोप लाभावी म्हणून जसें सर्व जीवन कांहीं नियमानें नियंत्रित करावे लागते, तसेंच ब्रह्मानंदाच्या अनुभवासाठीहि साधना करावी लागते.
COPYRIGHT © 2026 श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित

