कोणतेहि तत्त्व केवळ शब्दाच्या बळावर कधीहि जाणले जात नाहीं. तें अनुभवासच यावें लागतें. तेंच ब्रह्माच्या संबंधांतहि होतें. एक जुने वचन आहे “कसें बोटाने दाखवू तुला, घे अनुभव गुरुच्या मुला।” बोटाने दाखवितां येण्यासारखी, ही अमुक अमुक म्हणून वर्णन करून सांगण्यासारखी, ब्रह्म ही वस्तु नाहीं. ती अनुभवास येऊ शकते. गाढ झोपेसारखे हें आहे. म्हणून तर शास्त्रकारांनीं निद्रेला ब्रह्मानंदसहोदर असें विशेषण दिलें आहे.
COPYRIGHT © 2026 श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित

