विचाराला चालना मिळविण्यासाठी वादविवादाचा, चर्चेचा थोडा-बहुत उपयोग होतो, नाहीं असें नाही. प्रकृतिभेदानें प्रत्येकाची पातळी आणि रुचि वेगवेगळी असल्यानें त्यांना मानवेल अशी मतप्रणाली या विविध प्रकारच्या चर्चेतून उपलब्ध होते. तेव्हां साधकाने आपल्या प्रवृतीला जें भावते तें निवडून घ्यावें. हाच विवेक. आणि मग एकनिष्ठेनें सतत प्रयत्नशील राहून आपल्या ध्येयाशी एकरूप होतां येईल अशी साधना करावी.