ॐ श्री 卐

ll श्रीशंकर ll

हिंदू राष्ट्र, हिंदू संस्कृति, वेद व आयुर्वेद हे पू. स्वामी वरदानंद भारती यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय होते. धर्मकार्य, देशकार्य व संस्कृतीच्या संवर्धनासाठी उत्तम कार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्था यांना पाठबळ देण्यासाठी, त्यांनी घेतलेल्या निस्पृह कष्टाची, केलेल्या नि:स्वार्थ त्यागाची दखल घ्यावी व त्यांचे महनीय कार्य समाजापुढे यावे, या हेतूने श्रीदासगणू महाराजांच्या स्मृतिप्रीत्यर्थ “श्रीदासगणू पुरस्कार” प्रदान करण्याची योजना पू. अप्पांनी स्वतःच्या हयातीतच इ. स. १९९८ या वर्षी कार्यान्वित केली होती. श्रीदासगणू महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजे कार्तिक वद्य त्रयोदशीला श्रीदासगणू महाराजांनी पंढरपूरच्या ज्या वाड्यात आपला देह श्री पांडुरंगाच्या चरणी अर्पण केला, त्या त्यांच्या “दामोदराश्रम” येथेच हा पुरस्कार प्रदानाचा कार्यक्रम प्रतिवर्षी होत असतो.

रु.२५,०००/- पासून सुरू केलेला हा पुरस्कार सध्या रु. १,२५,०००/- इतक्या रक्कमेपर्यंत वाढवीत नेला आहे. स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफल व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

इ. स. १९९८ पासून आतापर्यंत खालील व्यक्ती/ संस्थांना “संतकवी श्रीदासगणू महाराज” पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

अ. क्र. वर्ष पुरस्काराचे मानकरी पुरस्काराची रक्कम
१९९८ प्रज्ञालोक (त्रैमासिक), नागपूर. २५,०००/-
१९९९ धर्मभास्कर (मासिक), मुंबई. २५,०००/-
२००० पाञ्चजन्य (साप्ताहिक), दिल्ली. २५,०००/-
२००१ जनजाती विकास समिती, डीमापूर – नागालैंड
श्री. सुनील चिंचोलकर, पुणे.
२५,०००/-
१०,०००/-
२००२ डॉ. मु. श्री. कानडे, पुणे
डॉ. ज. द. जोगळेकर, मुंबई.
२५,०००/- प्रत्येकी
२००३ मसुराश्रम, गोरेगाव, मुंबई. २५,०००/-
२००४ डॉ. ग. बा. पळसुले, पुणे. २५,०००/-
२००५ श्री शिवप्रतिष्ठान–हिंदुस्तान, सांगली. ३१,०००/-
२००६ श्री गुरुदेव आश्रम, वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर. ३१,०००/-
१० २००७ श्री. विक्रम नारायण सावरकर, मुंबई. ३१,०००/-
११ २००८ प्रा. श्रीनिवास माणिकराव कुलकर्णी, नागपूर. ५१,०००/-
१२ २००९ श्री. द्वा. वा. केळकर, पुणे. ५१,०००/-
१३ २०१० श्री सच्चिदानंद वेद स्वाध्याय प्रतिष्ठान, ध. टाकळी, ता.पूर्णा, जि.परभणी. ५१,०००/-
१४ २०११ श्री एकनाथ संशोधन मंदीर, छ.संभाजीनगर. ६१,०००/-
१५ २०१२ श्री समर्थ वाङ्देवता मंदिर, धुळे. ७५,०००/-
१६ २०१३ सौ. सुनिला हरि सोवनी, पुणे. ७५,०००/-
१७ २०१४ श्री हरि कीर्तनोत्तेजक सभा, पुणे. ७५,०००/-
१८ २०१५ श्री. जगन्नाथ चव्हाण, तळेगाव दाभाडे, जि. पुणे. १,००,०००/-
१९ २०१६ श्री. दिलीप वासुदेव आपटे, गीता फाउंडेशन, मिरज, जि. सांगली. १,००,०००/-
२० २०१७ श्री चतुर्वेदेश्वर धाम, सावरगाव, ता. परतूर, जि. जालना. १,००,०००/-
२१ २०१८ सांस्कृतिक वार्तापत्र (पाक्षिक), पुणे. १,००,०००/-
२२
२०१९ साप्ताहिक पंढरी संदेश, पंढरपूर. १,००,०००/-
२३
२०२० स्वा. सावरकर प्रेमी मंडळ, पंढरपूर. १,००,०००/-
२४
२०२१ धर्म जागरण ट्रस्ट (पश्चिम महाराष्ट्र). १,२५,०००/-
२५
२०२२ वैदर्भीय हरिकीर्तन संस्था, नागपूर. १,२५,०००/-
२६
२०२३ डॉ. शरद पांडुरंग हेबाळकर, अंबाजोगाई, जि. बीड. १,२५,०००/-

याच दिवशी संस्कृत भाषा संवर्धन पुरस्कारहि प्रदान केला जातो. या पुरस्कारामागची भूमिका व पुरस्कार्थींची नावे पाहण्यासाठी खालील link वर click करा.

Click Here

प.पू.स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे प्राचार्य अनंत दामोदर आठवले) उर्फ पू.अप्पा यांचे शालेय शिक्षण पंढरपूरला ज्या प्रशालेतून पूर्ण झाले त्या आपटे प्रशालेतील शालान्त परीक्षेत इ.स. २०२० पासून सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याचा गौरव करावा असा निर्णय श्रीराधादामोदर प्रतिष्ठानने घेतला आहे. अशा गुणवंत विद्यार्थ्यांची नावे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Click Here

स्वामी वरदानंद भारती (पू. अप्पा) यांची संस्कृत स्तोत्रे वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.

https://sanskritdocuments.org/sanskrit/varadananda/