ॐ श्री 卐
ll श्रीशंकर ll
प.पू.स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे प्राचार्य अनंत दामोदर आठवले) उर्फ पू.अप्पा यांचे शालेय शिक्षण पंढरपूरच्या आपटे उपलप प्रशाला येथून पूर्ण झाले. इ.स. २०२० साली पू.अप्पांची जन्मशताब्दी संपन्न झाली. या वर्षी पासून आपटे प्रशालेतील शालान्त परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याचा गौरव करावा – असा निर्णय श्रीराधादामोदर प्रतिष्ठानने घेतला आहे. स्मृतीचिन्ह, श्रीफळ, रोखरक्कम (रु. ५०००/-) असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
आतापर्यंत खालील विद्यार्थ्यांना गौरवान्वित करण्यात आले आहे.
(१) ~ २०२० ~ सानिका रामचंद्र देशपांडे
(२) ~ २०२१ ~ प्रथमेश गणेश गंगेकर
(३) ~ २०२२ ~ ज्ञानेश्वरी रामचंद्र शिंदे
(४) ~ २०२३/१ ~ संदेश संतोष करकमकर
(५) ~ २०२३/२ ~ संस्कृती संजय बारसावडे
(६) ~ २०२३/३ ~ तन्वीर रियाज मुलाणी