साधकाची चिंतनिका

15.00

श्रीमद्‌जगद्‌गुरु शंकराचार्य विरचित तीन रचना – ‘प्रातःस्मरण’, ‘चित्तप्रसाद’ आणि ‘ते धन्या:’ यावर प पू स्वामी वरदानंद भारती यांनी केलेले विवेचन “साधकाची चिंतानिका ” या ग्रंथात आहे.

Description

श्रीमद्‌जगद्‌गुरु शंकराचार्य विरचित तीन रचना – ‘प्रातःस्मरण’, ‘चित्तप्रसाद’ आणि ‘ते धन्या:’ यावर प पू स्वामी वरदानंद भारती यांनी केलेले विवेचन “साधकाची चिंतानिका ” या ग्रंथात आहे. प्रातःस्मरण – परमार्थ हा अनुभूतीचा विषय असल्याने साधना करणे नितांत आवश्यक! अर्थात या साधनेचा प्रारंभही प्रातःकाली उठल्यापासून व्हावा हेच उचित! स्वाभाविकपणेच माणसाचे मन यावेळी प्रसन्न असते म्हणूनच साधनेलाही हीच वेळ योग्य असे मानले जाते- सर्व साधकांना मार्गदर्शक व्हावे या दृष्टीने भगवान्‌ शंकराचार्यांनी तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने केलेले सर्वश्रेष्ठ प्रातःस्मरण स्तोत्राच्या तिन्ही श्लोकांचे सुंदर साक्षेपी विवेचन पू. स्वामीजींनी केलेले आहे.

चित्तप्रसाद – भगवान शंकराचार्यांनी मनुष्याला चित्ताची प्रसन्नता कशी लाभेल ते स्पष्ट करताना एक छोटेसे प्रकरण लिहिले- चित्तप्रसाद! स्वामीजींनी त्यावर केलेले प्रवचन साधकांना प्रसन्नता मिळवून देईल.

ते धन्या: – भगवान्‌ शंकराचार्य स्वतः कशामध्ये धन्यता मानीत होते किंवा धन्य म्हणवून घेण्यासाठी काय असावे लागते याचे विवेचन ‘ते धन्या:’ या एका छोट्याशा प्रकरणात करतात. पू. स्वामीजींनी त्यावरही विवेचन केलेले असून शंकराचार्यांचे हृद्‌गत आपल्यासमोर प्रकट केलेले आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “साधकाची चिंतनिका”

Your email address will not be published. Required fields are marked *