Description
जीवनसाधना ग्रंथामध्ये भगवद्गीतेच्या १८ व्या अध्यायावर प.पू. स्वामी वरदानंद भारती यांनी सोप्या-सरळ भाषेत समाजप्रबोधक विवरण नि:संदिग्धपणे केले आहे. त्यांच्या वाङ्मयाला व्यासंगाचा, सव्यसाची बुद्धिमत्तेचा व परतत्त्वाचा स्पर्श असल्याने हे भाष्य प्रबोधनात्मक असले तरी रोचक झाले आहे. अठरावा अध्याय म्हणजे ‘एकाध्यायी गीताच!’ हा अध्याय भगवद्गीता ज्ञानमंदिराचा कलशाध्याय म्हणून ओळखला जातो.
या अध्यायावरील भाष्याला ‘जीवनसाधना’ हे शीर्षक अत्यंत समर्पक ठरते. कारण भगवद्गीतेतील सर्व तत्त्वबोध येथे साररूपाने ग्रथित झाला आहे. प.पू. स्वामीजींचे संपूर्ण वाङ्मय अध्यात्मिक साधनेला मार्गदर्शनपर आहे. साधनामार्गावर साधकाची वाटचाल आयुष्यभर एखाद्या व्रताच्या निष्ठेने होते, व्हावी अशी अपेक्षा असते, म्हणून ‘जीवनसाधना’. प.पू. स्वामीजींचे हे भाष्य म्हणजे साधनमार्गासाठी वस्तुपाठच आहे. त्याचे स्वरूप ‘आधी केले मग सांगितले’ असल्याने अधिक महत्त्वाचे व अमूल्य ठरते.
Reviews
There are no reviews yet.