महाभारताचे वास्तव दर्शन

250.00

भारतीय परंपरेत वेदांच्या खालोखाल महाभारत ग्रंथाला महत्त्व दिले जाते. त्यामुळेच त्याचा ‘पंचमवेद’ म्हणून उल्लेख केला जातो, हे सर्व विश्रुत आहे. भारतीय संस्कृतीचे पुरेपूर दर्शन त्यामधून होते. भारतीय तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनेही या ग्रंथाचे महत्त्व अलौकिक आहे. नीतिकल्पना, सामाजिक धारणा, स्थैर्य आणि राजकारण याही दृष्टीनी या ग्रंथाचे मोठेपण मान्य करावे लागेल. आजही अगदी राजकारणाच्या दृष्टीनेही या ग्रंथाचे मार्गदर्शन मोलाचेच ठरेल असा हा अद्वितीय ग्रंथ आहे.
वास्तविक महाभारत हा एक इतिहास ग्रंथ ! परंतु आज मात्र या ग्रंथावर साहित्यिक आपली निरंकुश लेखणी स्वैरपणे चालविताना दिसतात. ह्या सर्वश्रेष्ठ ग्रंथातील अनेक चांगल्या व्यक्तिरेखांचे साहित्यिक विकृतीकरण करतात. जणू साहित्यिकांनी हा विडाच उचललेला आहे. मूळ ग्रंथावर किमान अन्याय होणार नाही एवढी तरी काळजी साहित्यिकांनी घेतली पाहिजे, पण ती ते घेत नाहीत. विसंगती, विकृतीकरण, आणि असत्याधिष्ठित कल्पनाविलास या सर्व लेखनातून फार दिसतो. याचा स्वाभाविक परिणाम म्हणून जाणत्यांमध्येही संस्कृती व परंपरेवर दृढ श्रद्धा असणाऱ्यांमध्येही – एक प्रकारची विफलता – औदासिन्य दिसून येते. छापले आहे ते बरोबर आहे असे मानणारेच हजारोंनी असतात. म्हणूनच सर्वसामान्यांच्या संस्कृती- प्रेमावर होणारे असे आघात परतवून लावणे हे एक कर्तव्यच ठरते.
१९७० च्या दशकात प पू स्वामी वरदानंद भारती ( पूर्वाश्रमीचे प्रा. अनंतराव आठवले ) यांनी ते कर्तव्य बजावले होते. त्यांनी आपल्या ओजस्वी लेखणीने, ओघवत्या वाणीने अशा आक्षेपांना उत्तरे दिलेली होती, अप्पांच्या ह्या ग्रंथाचा दबदबा एवढा आहे की निदान यापुढे तरी ललित
लेखक वस्तुनिष्ठ लेखन करतील. प्रसिद्धीसाठी अतिरंजित नि विपर्यस्त लेखन करताना निश्चितच विचार करतील. म्हणूनच “महाभारताचे वास्तव दर्शन” ह्या ग्रंथाला वेगळे मोल आहे दुर्दैवाने आजही त्या परिस्थितीत फारसा फरक पडला नाही . त्याच प्रकारच्या विकृत लेखनाची नवनिर्मिती आजच्या social media च्या युगात फारच झपाट्याने पसरते आणि म्हणूनच या पुस्तकाची डिजिटल आवृत्ती काढण्याचे निश्चित केले आहे.

Category:

Description

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महाभारताचे वास्तव दर्शन”

Your email address will not be published. Required fields are marked *