Description
उपनिषदर्थकौमुदी खण्ड ३ यात छान्दोग्य उपनिषदाचे ओवीबद्ध निरूपण प.पू. वरदानंद भारतींनी केले आहे. या निरूपणात बोली भाषेची लय आणि प्रवाहिता आहे, दृष्टान्त देत देत पुढे जाण्याची आणि अवघड सिद्धान्त उकलून दाखविण्याची शिक्षकी हातोटी आहे, श्रोत्यांशी वा वाचकांशी थेट संवाद साधणारी कीर्तनकारी शैली आहे. तसेच प्रतिपाद्य वस्तूबद्दल अतोनात आदर, निष्ठा आहे आणि श्रोत्यांच्या भल्याची कळकळ आहे. हे या निरूपणाचे सहज दिसणारे विशेष आहेत. हे निरूपण वाचत असताना प पू स्वामीजी भेटल्याचा पुनः प्रत्यय वाचकांना वारंवार होईल असा विश्वास आहे.
Reviews
There are no reviews yet.