ॐ श्री 卐
ll श्रीशंकर ll
प.पू.स्वामी वरदानंद भारती यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या “श्रीदासगणू महाराज पुरस्कार” याचे यंदा २८ वे वर्ष असून धर्मकार्य, देशकार्य व संस्कृतीच्या संवर्धनासाठी उत्तम कार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्था यांना पाठबळ देण्यासाठी, त्यांनी घेतलेल्या निस्पृह कष्टाची, केलेल्या नि:स्वार्थ त्यागाची दखल घ्यावी व त्यांचे महनीय कार्य समाजापुढे यावे, या हेतूने श्रीदासगणू महाराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्रीराधादामोदर प्रतिष्ठान व संतविद्या प्रबोधिनी यांच्या वतीने प्रतिवर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
आजमितीला अखिल हिंदुस्थानातील विद्वानांत श्रेष्ठ गणले जाणारे, वैदिक धर्माचरण करणारे वे. शा. सं. गणेश्वरशास्त्री जी द्रविड (वाराणसी) यांना या वर्षीचा संस्कृती संवर्धनाचा “श्रीदासगणू महाराज पुरस्कार” जाहीर करताना श्रीराधादामोदर प्रतिष्ठान व संतविद्या प्रबोधिनी यांना विशेष आनंद होतो आहे.
ज्योतिष शास्त्राविषयी शास्त्रीजींचा विशेष लौकिक देशभर पसरलेला आहे. या शास्त्रावर त्यांचे संशोधनात्मक लिखाणहि प्रसिद्ध आहे. पंचांगविचार (कालमापन शास्त्र) आणि धर्मशास्त्र यावर शास्त्रीजींचा अभ्यास, व्यासंग व अधिकार देशभर मान्य आहे. तसेच सामाजिक, धार्मिक व राजकीय पातळीवरील शास्त्रीजींचे बहुमोल मार्गदर्शन समस्त समाजाला भूषणावह आहे. सांगवेद विद्यालय चालविण्याचे महत्पावन कार्यहि शास्त्रीजींनी नेटाने चालू ठेवले आहे.
शास्त्रीजीं सारख्या ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध समाजहितैषी विद्वानाला यंदाचा पुरस्कार अर्पण करण्यात प्रतिष्ठानला परम धन्यता वाटते आहे. रोख रु. १.२५ लाख, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सदर पुरस्कार वितरणाचा समारंभ संतकवी श्रीदासगणू महाराज यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजे कार्तिक वद्य १३ शके १९४७, सोमवार, दि. १७/११/२०२५ रोजी ‘दामोदराश्रम’, खिस्ते गल्ली, गोविंदपुरा, पंढरपूर, येथे दुपारी ०४ ते ०६ या दरम्यान संपन्न होणार आहे.
याच वेळी संस्कृत भाषा घेऊन पुणे व लातूर विभागातून शालान्त परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्कृत भाषा संवर्धनाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. रोख रु. १० हजार, श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्यांची नावे अशी आहेत.
पुणे विभाग
सन २०२३ – कु. गौरवी महेश ठुबे, पारनेर
सन २०२४ – कु. स्वप्नाली शशिकांत महाजन, पंढरपूर
सन २०२५ – कु. तनुजा बालाजी चोपडे, सांगोला
लातूर विभाग
सन २०२५ – कु. समृद्धी यशवंत जाधव, लातूर
तसेच याच वेळी पंढरपूरच्या आपटे उपलप प्रशाला या शाळेतून शालान्त परीक्षेत सर्व विद्यार्थ्यातून सर्वप्रथम आलेली कु. तुलसी नागेश कबाडे हिचा ‘अनंत प्रज्ञा पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे. रोख रु. १० हजार, श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सदर समारंभास आपली सन्माननीय उपस्थिती प्रार्थनीय आहे.
-*-*-*-*-*-*-*-
ॐ सर्वे भवन्तु सुखिनः। सर्वे सन्तु निरामयाः। सर्वे भद्राणि पश्यन्तु। मा कश्चित् दुःख भाग्भवेत्॥
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥
आता पर्यंत ज्या मान्यवर व्यक्ती, संस्था यांना “श्रीदासगणू” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे त्यांची यादी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Click Here.
“सर्वे सन्तु निरामयाः क्षितितलें भद्राणि पश्यन्तु च॥”
ॐ श्री 卐
ll श्रीशंकर ll
ॐ श्री 卐 ll श्रीशंकर ll ॐ श्री 卐
श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र म्हणताना पाठात लक्ष ठेवण्याची क्लृप्ति जाणून घेण्यासाठी येथे click करा.
