आज पू. अप्पांची दीक्षा ग्रहण एकादशी ! या निमित्ताने उत्तरकाशी येथील पू. अप्पांच्या परमपवित्र निवासी कक्षाचे दर्शन.
आज पू. अप्पांची दीक्षा ग्रहण एकादशी ! २७ वर्षांपूर्वी आजच्याच तिथीला पू. अप्पांनी श्रीक्षेत्र उत्तरकाशी येथे गिरीराज अशा “स्थावराणां हिमालय:” व कलीमलनाशक “स्रोतसामस्मि जान्हवी” च्या साक्षीने महामंडलेश्वर स्वामी विद्यानंदगिरी यांच्या कडून विधिवत संन्यास दीक्षा घेतली होती.
या निमित्ताने ज्या कक्षात पू. अप्पांनी परमोच्च साधना केली व फलस्वरूप श्रीवरद नारायणाने त्यांना जिथे आपणात एकरूप करून घेतले, “जीवनाच्या सार्थकाचा दिवस” जिथे पू. अप्पांनी अनुभवला, त्या उत्तरकाशी येथील श्रीदासगणू परिवारासाठी तीर्थस्थळस्वरूप असलेल्या उत्तरकाशी येथील पू. अप्पांच्या परमपवित्र निवासी कक्षाच्या दर्शनाची चित्रफित या संकेतस्थळावर “चित्रदालन” या मुख्य शीर्षांतर्गत “चलचित्रफिती” या शीर्षांतर्गत उपलब्ध केली आहे. विशेष म्हणजे श्री.महेश अण्णा व श्री.पद्मनाभ यांच्या आवाजातील “श्रीनारायण” या भजनाची धून या चित्रफितीच्या पार्श्वभागाला दिली आहे.
जरूर लाभ घ्या.

प्रसन्नं परमोदारं वरदं सुस्मिताननम्

पंढरपूर येथे दि. २५, २६ व २७ ऑक्टोबर २०१८ दरम्यान श्रीसंतपूजन व तीन दिवसीय शिबीर संपन्न होणार आहे.

या दरम्यान “श्रीगजाननविजय” या ग्रंथाचे पारायण होणार असून इतर कार्यकमांचा तपशील खालील प्रमाणे राहील.

स्थळ : श्रीगजानन महाराज मठ, पंढरपूर.

गुरुवार, दि. २५/१०/२०१८
सकाळी ०७३० ते ०९ प्रार्थना, प्रवचन
प्रवचनकार : ह. भ. प. श्री. चैत्यन्य महाराज देगलूरकर
सकाळी ०९३० ते ११३० पारायण
दुपारी ०४ ते ०५३० श्रीसंतपूजन
सायंकाळी ०६ ते ०८ श्रीविष्णुसहस्रनाम व कीर्तन
कीर्तनकार : श्री. विक्रम नांदेडकर

शुक्रवार, दि. २६/१०/२०१८
सकाळी ०७३० ते ०९ प्रार्थना, प्रवचन
प्रवचनकार : ह. भ. प. श्री. चैत्यन्य महाराज देगलूरकर
सकाळी ०९३० ते ११३० पारायण
दुपारी ०३ ते ०५३० “सत्पथवासरमणि” या विषयावर परिसंवाद
वक्ते : श्री. वा. ना. उत्पात, पंढरपूर
वि. वा. कल्याणीताई नामजोशी, पुणे
श्री. शिरीष लिमये, पुणे.
श्री. बा. ल. चोथवे, परभणी.
सायंकाळी ०६ ते ०८ श्रीविष्णुसहस्रनाम व कीर्तन
कीर्तनकार : श्री. महेशअण्णा आठवले.

शनिवार, दि. २७/१०/२०१८
सकाळी ०७३० ते ०९ प्रार्थना, प्रवचन
प्रवचनकार : ह. भ. प. श्री. चैत्यन्य महाराज देगलूरकर
सकाळी ०९३० ते ११३० पारायण समाप्ती व शिबिराची सांगता.

: सूचना :
(१) शिबिरासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे.
(२) पारायणासाठी “श्रीगजाननविजय” हा ग्रंथ प्रत्येकाने स्वतःचा आणावा किंवा पंढरपूरला मठाच्या कार्यालयातून विकत घ्यावा.
(३) शिबिरार्थींनी दि. २४/१०/२०१८ रोजी सायंकाळी ०४ नंतर कार्यक्रमस्थळी पोचावे.
(४) सर्व कार्यक्रम वेळेवर सुरु होतील. कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी सर्वांनी ०५ मिनिटे आधी कार्यक्रमासाठी उपस्थित असणे आवश्यक आहे.
(५) सर्वत्र शांतता-शिस्त-पवित्रता राखून कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य असावे.

 

जरूर वाचा.

 

-: विशेष माहिती :-

GOOGLE APP STORE वर “श्रीराधादामोदर प्रतिष्ठान”“मनोबोध” हे दोन APP उपलब्ध केले आहेत.
आपल्या मोबाईलवर हे APP INSTALL करून श्रवणाचा लाभ घ्या.
(“श्रीराधादामोदर प्रतिष्ठान” या APP मध्ये पू. दादा व पू. अप्पा यांची बरीच स्तोत्रे उपलब्ध केली आहेत व “मनोबोध” या APP मध्ये आ.वसुताईंच्या आवाजात ध्वनीमुद्रित झालेला पू. अप्पांचा ‘मनोबोध’ हा ग्रंथ श्राव्य स्वरूपात उपलब्ध आहे.)