4)धर्माची चिरंजीव लक्षणे कोणती ? धर्म व वाद (इझम) यांत भेद काय ? प्रार्थनापर धर्म आणि साधनापर धर्म म्हणजे काय ? धर्मप्रधान भारतीय जीवन म्हणजे काय ? (इतके विविध धर्म का निर्माण झाले ?)

https://s3.us-east-2.amazonaws.com/hs09071701/wataApalyaHitachya/006-Prashna-004.mp3

7)हिंदू धर्माची अपरिवर्तनीय त्रिकालबाधित चिरस्थायी अशी तत्वे कोणती ? कालमान, परिस्थिती यांच्या अनुसार व्यवस्थेच्या व रचनेच्या स्वरुपामध्ये असलेली हिंदू़ धर्माची अंगे कोणती ?

https://s3.us-east-2.amazonaws.com/hs09071701/wataApalyaHitachya/006-Prashna-007.mp3

18)सामाजिक कर्तव्याची पालन करण्याची प्रवृत्ति धर्मशिक्षणातून कशी निर्माण करता येईल ? समाजसेवा हीच ईश्वरसेवा ही निष्ठा ख्रिस्ती मिशनऱ्यांत आढळते, तेवढी हिंदूत आढळत नाही. असे का ?

https://s3.us-east-2.amazonaws.com/hs09071701/wataApalyaHitachya/006-Prashna-018.mp3

22)अन्य धर्म व हिंदू धर्म यांच्यातील फरकाचे नेमके मुद्दे कोणते ? हिंदू धर्माचे श्रेष्ठत्व कशांत ? अन्य धर्मियांत अनेक सत्वशिल प्रामाणिक ध्येयनिष्ठ अशी माणसे आढळतातच ना !

https://s3.us-east-2.amazonaws.com/hs09071701/wataApalyaHitachya/006-Prashna-022.mp3

26)हिंदू धर्मामध्ये फक्त ब्राह्मणास मांस वर्ज्य का ? मांसाने बुध्दीला अडथळा येतो असे म्हणावे तर मांसभक्षक युरोपियन जगज्जेते आहेत. वेदाचे याबाबत काय सांगणे आहे ? व्यवहारात कसे वागावे ?

https://s3.us-east-2.amazonaws.com/hs09071701/wataApalyaHitachya/006-Prashna-026.mp3

27)सहस्त्रावधि वर्षांच्या प्रक्रियांमधून हेाणारे परिणाम सोसत आलेला आपला अलिकडचा हिंदू समाज ज्या स्वरुपात दिसतो आहे, त्या स्वरुपात त्याने पुरातन श्रेष्ठ संस्कृतीचा वारसा सांगावा यात वैशिष्ट्य कोणते ?

https://s3.us-east-2.amazonaws.com/hs09071701/wataApalyaHitachya/006-Prashna-027.mp3

31)आमची संस्कृती ही भोगप्रधान नसून त्यागप्रधान आहे. याचा अर्थ भौतिक प्रगति आणि विज्ञानाने मिळणारी सुखे आम्हाला नको आहेत असा अभिप्रेत आहे काय ? आपल्या संस्कृतिचा भौतिक सुखाशी विरोध आहे काय?

https://s3.us-east-2.amazonaws.com/hs09071701/wataApalyaHitachya/006-Prashna-031.mp3

32)संस्कृती व धर्म एकच का ? अंतर असल्यास कोणते ? संस्कति हा विचार व सभ्यता हा त्याचा प्रगट होणारा बाह्यचार हे म्हणणे योग्य आहे काय ? या दृष्टीने हिंदू संस्कृतिचे स्पष्टीकरण करता येईल का ?

https://s3.us-east-2.amazonaws.com/hs09071701/wataApalyaHitachya/006-Prashna-032.mp3

34)श्रुतिस्मृतिवर अधारित असा हा आपला वैदिक धर्म आहे. पण स्मृतिकार अनेक असून त्यांनी कालानुरुप शास्त्रात, व्यवस्थेत बदल केले आहेत कां ? पुढेही हे हेाणे अभिप्रेत आहे का ? असे बदल शासनाने केले तर चालणार नाही का ?

https://s3.us-east-2.amazonaws.com/hs09071701/wataApalyaHitachya/006-Prashna-034.mp3

35)“न राज्यं नैव राजाšसीत” अशी समाजरचना कधी होती का ? ती पुन्हां दृष्टिपंथात आणता येईल का ? या पद्धतीत व साम्यवाद्यांच्या शासनमुक्त समाजव्यवस्थेत (स्टेटलेस सोसायटीत) कोणते अंतर आहे ?

https://s3.us-east-2.amazonaws.com/hs09071701/wataApalyaHitachya/006-Prashna-035.mp3

38)चांगले-वाईट, उपकारक-अपकारक हे मुळातच परिस्थितीसापेक्ष असल्याने व हिंदू समाजाला वेळोवेळी निरनिराळया परिस्थतीतून जावे लागले असल्याने सकृतदर्शनी तरी अनेक परस्पर विरुध्द गोष्टींचा अदभुत संग्रह त्याचे ठिकाणी झाला आहे. त्या सर्वांमधून आजच्या परिस्थितीला योग्य अशा गोष्टींची निवड कशी करावी ? त्यासाठी निकष वा मानदंड कोणता लावावा ?

https://s3.us-east-2.amazonaws.com/hs09071701/wataApalyaHitachya/006-Prashna-038.mp3

40)जन्माने वर्ण नेमणे व त्यामुळे पारंपारिक धंद्यातच रहावे लागणे हे योग्य आहे का ? त्यामुळे उद्योग-स्वातंत्र्य हिरावले जात नाही का ? जातीय भेद, चातुर्वर्ण्य आजच्या काळात योग्य आहे का ? त्यात दोष किंवा विकृति नाहीत का ? अस्पृश्यता , जातीय भेद हे त्यामुळेच निर्माण झालेले आहेत. अशा स्थितीत चातुर्वर्ण्य स्वीकारावेत का ? समाज जीवनाचे नियम (तत्वे) अपरिवर्तनीय व रचना परिवर्तनीय हे कसे व कोण ठरवणार?

https://s3.us-east-2.amazonaws.com/hs09071701/wataApalyaHitachya/006-Prashna-040.mp3

42)वर्णव्यवस्था किंवा मनुस्मृती यांच्यावर आक्षेप का घेतला जातो ? अस्पृश्यता, उच्चनीचता व तज्जन्य वैषम्याची भावना असेपर्यंत हिंदू संघटन कसे शक्य आहे ?संघटनेसाठी आंतरजातीय विवाह प्रशस्त मानावेत का ?

https://s3.us-east-2.amazonaws.com/hs09071701/wataApalyaHitachya/006-Prashna-042.mp3

43)विविधतेला शरीराच्या अवयवांची आणि भावनात्मक एकतेला आत्म्याची उपमा देऊन त्यांच्या संयोगाप्रमाणे हे साधावे असे सांगितले जाते. पण्ं शरीराचे अवयव विचारशक्ती,भावना,विकार या सर्वांपासून मुक्त आहेत. यांचे उलट प्रत्येक व्यक्तीजवळ विचार-भावना-विकार या गोष्टी असतात. तेव्हा शरीर आणि आत्म्याप्रमाणे एकता कशी साधता येणार?

https://s3.us-east-2.amazonaws.com/hs09071701/wataApalyaHitachya/006-Prashna-043.mp3

45)दैववादाकडून प्रयत्नवादाकडे आपल्या समाजाचे परिवर्तन शिक्षणांतून वा धर्मशिक्षयातून कसे घडवून आणता येईल? (‘संभवामि युगे युगे याचा अर्थ सांगून अवाताराची वाट पाहत वसावे काय’)

https://s3.us-east-2.amazonaws.com/hs09071701/wataApalyaHitachya/006-Prashna-045.mp3

47)श्रीराम आणि श्रीकृष्ण यांना आपण आदरणीय महापुरुष इतकेच नव्हे तर ईष्वरी अवतार मानतो. अशा स्थितीत त्यांच्या जीवनातील अनेक घटना या ईश्वरी अवताराला तर राहूद्याचा मानवाच्या मोठेपणालाहि न शोभणाऱ्या आहेत, असे आक्षेप अनेकांकडून घेतले जातात. त्यासंबंधी तुम्हास काय म्हणावयाचे आहे?

https://s3.us-east-2.amazonaws.com/hs09071701/wataApalyaHitachya/006-Prashna-047.mp3

49)राधा ही प्रत्यक्षात अस्तित्वात नव्हतीच असे म्हटले जाते ते खरे आहे काय? उदात्त प्रेमाची ती एक सांस्कृतीक कल्पना आहे असे म्हटले जाते त्यात कितपत तथ्य आहे ?

https://s3.us-east-2.amazonaws.com/hs09071701/wataApalyaHitachya/006-Prashna-049.mp3

53)‘न स्त्री स्वातंत्र्यमर्हति’ असे मनुस्मृती म्हणते हे खरे आहे का? आणि तसे असेल तर ते तसे का म्हटले ? यामुळे स्त्रियांना सदैव दास्यांतच राहावे लागते. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होत नाही. अर्थाजन कराता येत नाही. हे योग्य आहे काय?

https://s3.us-east-2.amazonaws.com/hs09071701/wataApalyaHitachya/006-Prashna-053.mp3

55)वेदांमध्ये अश्लील म्हणता येईल अशा अर्थाचे काही मंत्र आहेत असे म्हणतात ते खरे आहे काय ? खरे असल्यास अशा मंत्राचे प्रयोजन काय ? वेदांसंबंधीच्या पवित्रतेच्या भावनेला त्यांने बाधा येणार नाही काय ?

https://s3.us-east-2.amazonaws.com/hs09071701/wataApalyaHitachya/006-Prashna-055.mp3

67)आजकाल सभोवार असे दिसते की नीतिनियम, सत्य, सदाचार वैगरे मूल्ये न पाळणाऱ्यांनाच विजय, श्रेष्ठत्व, लौकिक, सत्ता, संपत्ति प्राप्त होतात. अशा अवस्थेत नीतिमूल्यांच्या परिपालनांकडे सामान्य मनुष्य कसा आकर्षित व्हावा ? त्याची जिद्द कशी टिकावी ?

https://s3.us-east-2.amazonaws.com/hs09071701/wataApalyaHitachya/006-Prashna-067.mp3

71)अध्यात्म म्हणजे केवळ मोक्षप्राप्ती हा अर्थ योग्य आहे का ? व्यक्तिपुढे केवळ हेच घ्येय ठेवले व त्यामुळे हिमालयात जाऊन साधना करावी लागेल असे हेाऊ लागले तर व्यक्ति ही साधना करावी लागेल असे होऊ लागले तर व्यक्ति ही सामाजजीवनाकडे पाठ फिरविणारी, सामाजिक दृष्टिकोन न ठेवता वागणारी होणार नाही का ? मग समाजजीवन म्हणून काही राहील का?

https://s3.us-east-2.amazonaws.com/hs09071701/wataApalyaHitachya/006-Prashna-071.mp3

80)यज्ञयागांना काही वैज्ञानिक अर्थ आहे काय ? त्यानिमित्ताने होणारी खाद्य पदार्थांची नासाडी भारतासारख्या दारिद्रयरेषेखालील लोकांची बहुसंख्या असलेल्या देशात यज्ञयागादि कृत्ये योग्य मानावीत काय ?

https://s3.us-east-2.amazonaws.com/hs09071701/wataApalyaHitachya/006-Prashna-080.mp3

94)आपल्या देशात महागाई आणि भ्रष्टाचार सतत वाढतो आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जीवन दु:सह होत आहे. याच्यामागे मनुष्यस्वभावातील दोष कारण आहे की अर्थशास्त्रातील काही चुकीच्या धारणा कारणीभूत आहेत?

https://s3.us-east-2.amazonaws.com/hs09071701/wataApalyaHitachya/006-Prashna-094.mp3

100) मनुष्य म्हणजे केवळ शरीर नव्हे तर शरीर –मन-बुध्दि-आत्मा मिळून मनुष्य असे हिंदू तत्वज्ञान सांगते. पण शरीर लक्षात येते तसे इतरांचे नीट आकलन होत नाही. मग त्यांचे अस्तित्व का मनावयाचे ?

https://s3.us-east-2.amazonaws.com/hs09071701/wataApalyaHitachya/006-Prashna-100.mp3