प. पू. अप्पांनी सूचित केलेली श्रीकृष्णकथामृत या ग्रंथाची पारायण पद्धति
नियम म्हणून ज्यावेळी पारायण करायचे असेल त्यावेळी चौथ्या सर्गापासून सुरुवात करावी आणि १८ व्या सर्गानंतर १, २, ३ सर्ग वाचावेत. ज्यावेळी १८ व्या सर्गानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी एकदम पहिले ३ सर्ग वाचणे शक्य नसेल त्यावेळी प्रथम, सर्ग १, २, ४, ५ अश्या क्रमाने वाचीत जावेत व १८ व्या सर्गाच्या वाचनानंतर लगेच किंवा दुसऱ्याच दिवशी ३ रा सर्ग वाचावा आणि वाचनाची समाप्ती सर्वदाच चौथ्या सर्गाच्या पहिल्या ५ कविते नंतर म्हणजे “जणो गुलाले रंजित कमळे” येथ पर्यंत वाचून करावी.