अनुवाद ज्ञानेश्वरी
₹600.00
अनुवाद ज्ञानेश्वरी या ग्रंथात अर्थाबरोबर भावाचाही विचार आहे. हा भावानुवादही आहेच! शब्दासोबत भाव बदलला तर तो अनुवाद राहणार नाही. शब्दाचा सोपेपणा, अर्थाची सुलभता आणि भावाची एकवाक्यता म्हणजे पू.स्वामीजींची अनुवाद ज्ञानेश्वरी होय! श्रीज्ञानेश्वर महाराजांनी जसा भगवंताच्या भावाला शब्दरूप देऊन प्रकट केले तसे पू.स्वामीजींनी श्रीज्ञानेश्वरीतील श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या भावाला कुठेही धक्का लागू दिला नाही. श्रीज्ञानेश्वरीच्या निर्मितीमागील तळमळ, व्यापक हिताचे चिंतन हे सर्व येथेही प्रकट झाले आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्रीज्ञानेश्वर महाराजांनी जसा नम्र भाव वारंवार प्रकट केला आहे, तोच नम्र भाव येथेही प्रत्ययाला येईल. अनुवाद ज्ञानेश्वरीचा उपसंहार वाचला तर ते आपल्या ध्यानात येईल. नम्रता ही हिमालयासारखी उत्तुंग असते याचा प्रत्यय येतो.
Reviews
There are no reviews yet.