Description
भगवान श्रीकृष्ण हे No king, but King Maker आहेत, म्हणून भारतीय जीवनमूल्यांच्या संबंधात हे चरित्र आजच्या आत्मविस्मृत आणि प्रज्ञाहत समाजाला, विशेषतः परभृततेने राजकारण करणा्रया नेत्यांना वा समाजसेवा करू इच्छिणाऱ्या युवकांना अधिक मार्गदर्शक ठरेल. कृष्णचरित्रांत विसंगती शोधणा्रया विद्वान (?) संशोधकांनी, आदरणीय व्यत्तींच्या चारित्र्यहननात रुची घेणाऱ्यांनी हे अवश्य वाचावे. “या चरित्र लेखनाने नास्तिकांचे – समाधान होईल की नाही माहित नाही पण निदान निरागस अनभिज्ञांचा बुद्धिभेद टळेल” असा विश्वास त्यांनी शेवटी व्यत्त केला आहे. सहस्रों वर्षांची अक्षुण्ण परंपरा ज्या धर्मामुळे भारतीय जीवनात अबाधित राहिली त्या धर्माचे व धर्मराज्याचे महत्त्व भगवान श्रीकृष्ण-एक दर्शन या ग्रंथाने समजून येईल.
Reviews
There are no reviews yet.