Description
प पू स्वामी वरदानंद भारती यांच्या वाङ्मयीन मूर्तीला पहिल्या पातळीवरून अनुभवायचे असल्यास त्यांचे “वाटा आपल्या हिताच्या” हे पुस्तक पहावे. हे पुस्तक प्रश्नोत्तरांच्या स्वरुपात आहे. धर्म, संस्कृती, समाज, वेदवाङ्मय यांची ज्यांना पुरेपूर ओळख नाही, अशा नवागतांसाठी हे पुस्तक बहुमूल्य ठरावे असे आहे.
१०५ प्रश्न आणि त्यांना मिळालेली समर्थ उत्तरे वाचकाला अंतर्मुख करीत जातात. पू.अप्पांचे साधे सोपे शब्द प्रासादिक होवून विचारलेल्या शंकेचे मोठ्या जिव्हाळ्याने निरसन करतात. प्रश्नकर्ता जरी दुसरा असला तरी प्रश्न आपले आहेत या भावेनेने वाचक त्या उत्तरांची सार्थकता अधिक आपलेपणाने स्वीकारीत जातो. विचारलेले प्रश्नही सार्वभौम आहेत. केवळ विचारायचेत म्हणून विचारलेले नाहीत. त्यापाठी सखोल असे चिंतन जाणवते. वैचारिक बैठकीचा अंदाज येतो. संपादनातून प्रश्न-उत्तरांना ज्या क्रमामध्ये मांडले त्या अनुक्रमाने देखील महत्त्वाची भूमिका केली आहे.
Reviews
There are no reviews yet.