श्रीब्रह्मसूत्रार्थदर्शिनी

700.00

उपनिषदे, ब्रह्मसूत्रे व भगवत्गीता ही प्रस्थानत्रयी म्हणजे अध्यात्म मार्गावरचे टप्पे आहेत, मार्गदीप आहेत. या प्रस्थानत्रयीमुळे अध्यात्माचा मार्ग उजळला जातो. अध्यात्म मार्गावर राहण्यासाठी ब्रह्मसूत्रांचा अभ्यास अतिशय महत्त्वाचा ठरतो. कारण त्यात प्रत्यक्ष ब्रह्म म्हणजे काय, ब्रह्मज्ञान म्हणजे परमपुरुषार्थ जो मोक्ष त्याप्रत जाण्याची साधने कोणती, त्याचे फल काय या सर्वांचा उहोपाह श्रीब्रह्मसूत्रार्थदर्शिनी या ग्रंथातून प पू स्वामी वरदानंदभारती ( पूर्वाश्रमीचे श्री अनंत दामोदर आठवले ) केला आहे . श्रीब्रह्मसूत्रार्थदर्शिनीच्या अंतरंगाचे दर्शन घेताना आपल्याला असे दिसते की, पहिल्या अध्यायात उपनिषदांमधून ब्रह्माविषयी आलेल्या विविध वाक्यांचा समन्वय व प.पू. स्वामीजींनी त्यावरील सुबोध भाष्य, दुसऱ्या अध्यायात वेगवेगळ्या दार्शनिकांचे तत्त्वज्ञान, प.पू. स्वामीजींनी केलेले या मतांचे खण्डन, अद्वैत तत्त्वज्ञानाचे महत्त्व सांगून त्यांचे मण्डन, तिसऱ्या अध्यायात आत्मज्ञानासाठी विविध साधनांचे महत्त्व व त्या कशा कराव्यात याबद्दल मार्गदर्शन आणि चौथ्या अध्यायात या साधनांची फलश्रुती व त्यावरील विवेचन केले गेले आहे. असे हे महान तत्त्वज्ञान असलेला वेदव्यासरचित ‘ब्रह्मसूत्रे’ हा ग्रंथ मूळ संस्कृतमध्ये असल्यामुळे सामान्य जनता या तत्त्वज्ञानापासून वंचितच राहिली होती. सामान्य जनांचा कळवळा येऊन प.पू. स्वामीजींनीं ‘श्रीब्रह्मसूत्रादिदर्शिनी’ हा ग्रंथप्रपंच केला.

Category:

Description

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “श्रीब्रह्मसूत्रार्थदर्शिनी”

Your email address will not be published. Required fields are marked *