Description
आत्मानुसंधान या छोट्याशा ग्रंथामध्ये परापूजा आणि योगतारावली अशी आद्य शंकराचार्यांची दोन लहानशी प्रकरणे ह्यावरील स्वामी वरदानंद भारती यांनी केलेली विवचने ही एकत्र घेतली आहेत. दोन्हींचा मुख्य विषय अनुसंधान असाच आहे. पूर्णपणे निरहंकारतेने – सर्व समर्पणभावाने केलेली पूजा म्हणजे खरी पूजा – परापूजा. आपण सामान्य पातळीवर करतो ती पूजा अयोग्य नाही पण ही परापूजा सर्वोत्तम! त्या परापूजेचे रहस्य शंकराचार्यांनी मधुर काव्यांत मांडले. प. पू. अप्पांनी आपल्या रसाळ वाणीने त्यातले रहस्य उलगडून दाखविले. आधुनिक विज्ञानाचा सांधा त्याच्याशी जोडून दाखविला. त्यामुळे या प्रवचनाला वेगळाच भारदस्तपणा लाभला आहे. निरहंकारतेचे महत्त्व त्यातून लक्षात येते. योगतारावली या रचनेचा अनुवाद म्हणजेच योगतारावलीची सारबोधिनी टीका. ती. दासगणु महाराजांवर ज्यांचे निसीम प्रे होते त्या श्री. तात्यासाहेब पटवर्धन (संस्थान-मिरज) यांच्या आग्रहामुळे जन्माला आली. तास दीड तासात एकटाकी केलेले हे लेखन! ‘ग्रंथसार’ लेखनाचा एक आदर्श वस्तुपाठच! अध्यात्म क्षेत्रातली जाणती माणसे ‘योगतारावली’ आद्य शंकराचार्यांचे आत्मचरित्र मानतात. ह्यावरून या विषयाचे महत्त्व ध्यानात येईल.
In two small chapters in this book on ‘self-exploration,’ Swami Vardanand Bharati has compiled discussions exemplified by Adi Shankaracharya on profound worship and dedication. Both chapters revolve around the main theme of self-inquiry. Parapuja is true worship performed with complete selflessness, devotion, and surrender. While we commonly engage in worship on a superficial level, Parapuja is considered the highest form of worship. The enigma of Parapuja has been beautifully expressed by Shankaracharya in sweet poetry, and P. Pu. Swami Varadanand Bharati has revealed its secrets through his eloquent speech. Exploring and linking to the concepts of modern science has made this a unique and enriching discourse.
“Yogataravali Saarabodhini” is essentially an explanation or commentary on Adi Shankaracharya’s composition “Yogataravali.” This written piece by Swami Varadanand Bharati, completed in just two and a half hours, stands as an exemplary text for the study of scriptures. The importance of this subject is evident as experts in spiritual knowledge consider “Yogataravali” as the autobiography of Adi Shankaracharya.
Reviews
There are no reviews yet.