कथा संस्काराच्या संस्कृतीच्या

30.00

उदाहरणाने जी गोष्ट चटकन लक्षात येते ती बऱ्याच तार्किक विवेचनानेही समजणे सर्वांना शक्य नसते. अनेक सिद्धहस्त आणि श्रोतानुवर्ती प्रवाचकांच्या प्रमाणेच पूजनीय स्वामी वरदानंद भारती यांच्या शेकडो रसाळ प्रवचनांत अशा अनेक उदाहरणांची-घटनांची-कथांची चपखल पेरणी असते, आणि त्यातून त्यांचा प्रतिपाद्य विषय श्रोत्यांच्या मनावर बिंबतो, अनुभवात सामावतो.
अशी उदाहरणे-कथांचा विषयाशी फार दूरान्वयानेच संबंध आढळला, तर जागरूक श्रोत्याच्या मनाची पकड त्या घेत नाहीत आणि विसरल्या जातात, पण स्वामींच्या प्रतिपादनाच्या ओघात येणाऱ्या अशा कथा नेमक्या आणि चित्रदर्शी पद्धतीने सांगितलेल्या असतात, त्यामुळे यावरून मांडला जाणारा विचार पूर्णतेने ग्रहण केला जातो. या पुस्तकात, त्यांनी वेळोवेळी सांगितलेल्या निवडक उदाहरणांचा-
घटनांचा कथांचा समावेश केला असून, कोणत्या संदर्भाने ती गोष्ट लक्षात राहावी याचाही उल्लेख असल्याने हे पुस्तक केवळ सूत्ति-संग्रहासारखे नसून “अनौपचारिक बोलणे” ऐकावे असे हृद्य झाले आहे, “ये हृदयींचे, ते हृदयीं” अशासारखे!

Category:

Description

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कथा संस्काराच्या संस्कृतीच्या”

Your email address will not be published. Required fields are marked *