Description
प पू. स्वामी वरदानंद भारती यांचे गुरु प.पू. दासगणु महाराज यांनी केलेल्या छात्रबोधात स्वामीजींसाठी पुढील इच्छा व्यत्त केली होती-
या वैद्यक विद्येपरी। विद्या न दूसरी भूमीवरी।तीच कळसास न्यावी खरी। तू स्वकीय बुद्धि सामर्थ्ये॥
पू स्वामीजींनी पू.दादांची ही इच्छा अपेक्षेपेक्षाही अधिक प्रमाणात निश्चितच पूर्ण केली. पू स्वामीजींच्या आयुर्वेद ग्रंथ संपदेतील मुकुटमणि म्हणावा असा ग्रंथराज १ सप्टेंबर १९८० साली प्रसिद्ध झाला. हा ग्रंथ म्हणजेच श्रीमत् वृद्ध वाग्भट विरचित “अष्टांगसंग्रह” होय. या ग्रंथाचीही एक हजार पृष्ठे आहेत. या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो अथ पासून इतिपर्यंत संस्कृतात आहे. या ग्रंथामध्ये “अष्टांग-संग्रहा” वरील इंदू टीका पू. स्वामीजींच्या समाविष्ट केली आहे.
Reviews
There are no reviews yet.