ॐ श्री 卐

ll श्रीशंकर ll

श्रीक्षेत्र गोरटे येथे २०२४ या सालात संपन्न होणारे उत्सव महोत्सव

अ. क्र. उत्सव / कार्यक्रम तिथी तारीख
श्रीदासगणू महाराज जयंती उत्सव पौष शुद्ध दशमी ते द्वादशी
२० ते २२ जानेवारी २०२४
श्रीरामदास नवमी माघ वद्य अष्टमी ते दशमी
०४ ते ०६ मार्च २०२४
महाशिवरात्र माघ वद्य त्रयोदशी
०८ मार्च २०२४
श्रीतुकाराम बीज व श्रीनाथ षष्ठी फाल्गुन वद्य द्वितीया ते सप्तमी
२७ मार्च ते ०१ एप्रिल २०२४
श्रीविठ्ठलरुक्मिणी मंदिर वर्धापन सोहळा फाल्गुन वद्य एकादशी
०५ एप्रिल २०२४
श्रीराम नवमी चैत्र शुद्ध अष्टमी ते दशमी १६ ते १८ एप्रिल २०२४
पू. अप्पांची संन्यास दीक्षाग्रहण तिथी
चैत्र वद्य एकादशी ०४ मे २०२४
श्रीपरशुराम जयंती वैशाख शुद्ध तृतीया १० मे २०२४
श्रीनृसिंह जयंती वैशाख शुद्ध चतुर्दशी २२ मे २०२४
१० गंगा दशहरा ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते दशमी ०७ ते १६ जून २०२४
११ सद्गुरू वामनशास्त्री पुण्यतिथी उत्सव ज्येष्ठ वद्य दशमी ते द्वादशी ०१ ते ०३ जुलै २०२४
१२ गुरुपौर्णिमा आषाढ पौर्णिमा २१ जुलै २०२४
१३ गोकुळाष्टमी निमित्त श्रीकृष्णकथामृत या काव्य ग्रंथाचे पारायण श्रावण शुद्ध पंचमी ते श्रावण वद्य अष्टमी ०९ ते २६ ऑगस्ट २०२४
१४ स्वामी वरदानंद भारती स्मरण महोत्सव श्रावण वद्य दशमी ते चतुर्दशी २८ ऑगस्ट ते ०१ सप्टेंबर २०२४
१५ पू. अप्पांची जयंती (अनंत चतुर्दशी)
भाद्रपद शुद्ध चतुर्दशी १७ सप्टेंबर २०२४
१६ श्रीज्ञानेश्वर महाराज व सद्गुरू दासगणू महाराज पुण्यतिथी उत्सव कार्तिक वद्य दशमी ते चतुर्दशी २५ ते २९ नोव्हेंबर २०२४

* सद्गुरू वामनशास्त्री पुण्यतिथी उत्सव पुणे येथे आणि श्रीज्ञानेश्वर महाराज व सद्गुरू दासगणू महाराज पुण्यतिथी उत्सव पंढरपूर येथे संपन्न होत असतो.

* उर्वरित सर्व उत्सव गोरटे येथेच संपन्न होत असतात.

* गोरटे येथील उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांसाठी निवासव्यवस्था उपलब्ध आहे.

* प्रतिष्ठानच्या पूर्व परवानगीने व परिवारातील सदस्यांच्या विनंती नुसार काही उत्सव गोरटे व्यतिरिक्त इतर ठिकाणी आजोजित केले जावू शकतात.

* साधनेसाठी गोरट्याला येणाऱ्या साधकांसाठी नि: शुल्क भोजन आणि निवास व्यवस्था केली जाते. प्रतिष्ठानच्या संपर्क क्रमांकावर (०२४६७-२०२५१४) पूर्वसूचना दिल्यास भाविकांची गैरसोय होणार नाही. तथापि अनोळखी व्यक्तींना रात्रीच्या मुक्कामाची अनुमती नसते. नवीन व अपरिचित व्यक्तीस मुक्कामासाठी यायचे असल्यास श्रीदासगणू परिवारातील अनुग्रहित सदस्यांच्या ओळखीच्या शिफारशीने अनुमती देण्याबाबत विचार होऊ शकतो. मात्र अशा नवीन व अपरिचित व्यक्तीच्या गोरट्यास भेट देण्याचा उद्देश केवळ कुतूहल / उत्सुकता हा नसावा; साधना / उपासना करणे हा उद्देश असणे अनिवार्य आहे. तसेच येथील दिनक्रमाचे व शिस्तीचे पालन करून शांतता व पावित्र्य सांभाळावेच लागेल.