मराठवाडयातील एक संत व थोर कीर्तनकार म्हणून संतकवी श्री दासगणू महाराज अध्यात्माच्या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. शिर्डीच्या श्री साईबाबांच्या आज्ञेने त्यांनी संतचरित्रे लिहिली. त्यांनी दीड लाख काव्य-वाड्मय लिहून मराठी भाषेला समृद्ध केलेच पण त्यांच्या लेखनात समन्वविशेष दिसून येतो. भक्तिमार्गाचा प्रचार, संन्नीती -सदाचाराची शिकवण देऊन समाज जागृती करणे हे त्यांचे जीवनसूत्र होते. त्यांचे कार्य मराठी सारस्वताला एक देणगीच आहे. ते पंढरपुरी कार्तिक व. १३ शके १९११ (२६ नोव्हेंबर १९६२) या दिवशी वैकुंठवासी झाले.
COPYRIGHT © 2024 श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित