ॐ श्री 卐
ll श्रीशंकर ll
पहाटे ०५०० ते ०५१५ | सूर्यनमस्कार |
सकाळी ०७०० ते ०७१५ | ध्यान मंदिरातील प्रार्थना |
सकाळी ०७३०ते ०८०० | सकाळची प्रार्थना |
सकाळी ०९०० ते १०३० | श्रींना अभिषेक व पूजा |
दुपारी ११३० ते १२१५ | श्रींना नैवेद्य, आरती व स्तोत्रे |
सायंकाळी ०६४५ ते ०८१५ | भजनावली, सायं आरती व स्तोत्रे |
रात्रौ ०९०० ते ०९३० | श्रीविष्णुसहस्त्रनाम पाठ, स्तोत्रे व कृपायाचना |
* उत्सवाच्या वेळी व विशेष प्रसंगी यात बदल होवू शकतो.
ॐ श्री 卐
ll श्रीशंकर ll
गोरटे येथे सर्व प्रार्थनेनंतर व प्रत्येक कार्यक्रमानंतर केला जाणारा जयघोष
ll पुंडलीकवरदा हरि विठ्ठल ll
ll सद्गुरू ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय ll
ll सद्गुरू दासगणू महाराज की जय ll
ll स्वामी वरदानंद महाराज की जय ll
ll जय जय रघुवीर समर्थ ll
ll नमः पार्वतीपते हर हर महादेव ll
ll भारत माता की जय ll
-: महत्वाची सूचना :-
साधनेसाठी गोरट्याला येणाऱ्या साधकांसाठी नि: शुल्क भोजन आणि निवास व्यवस्था केली जाते. प्रतिष्ठानच्या संपर्क क्रमांकावर (०२४६७-२०२५१४) पूर्वसूचना दिल्यास भाविकांची गैरसोय होणार नाही.
तथापि अनोळखी व्यक्तींना रात्रीच्या मुक्कामाची अनुमती नसते. नवीन व अपरिचित व्यक्तीस मुक्कामासाठी यायचे असल्यास श्रीदासगणू परिवारातील अनुग्रहित सदस्यांच्या ओळखीच्या शिफारशीने अनुमती देण्याबाबत विचार होऊ शकतो.
मात्र अशा नवीन व अपरिचित व्यक्तीच्या गोरट्यास भेट देण्याचा उद्देश केवळ कुतूहल / उत्सुकता हा नसावा; साधना / उपासना करणे हा उद्देश असणे अनिवार्य आहे. तसेच येथील दिनक्रमाचे व शिस्तीचे पालन करून शांतता व पावित्र्य सांभाळावेच लागेल.