ॐ  श्री  卐                                   ll श्रीशंकर ll                                   ॐ  श्री  卐

भाषापंडित, सिद्धहस्त कवि ते, खासे टीकाकार ते |
नामी कीर्तनकार, निस्पृह खरे, तत्वज्ञ, आचार्य ते ||
ज्ञाते, साधक, राष्ट्रभक्त कडवे, सर्वज्ञ मर्मज्ञ ते |
कोणा काही असोत, ब्रह्मच आम्हा ते बोलते चालते ||

सज्जन हो, सप्रेम जयहरि.

वरील श्लोक वाचला असता सद्गुरू स्वामी वरदानंद भारती यांच्या स्वरूपाचे प्रतिबिंब मनचक्षूंपुढे उभे राहते. अशा या शतपैलू व्यक्तिमत्व असलेल्या अष्टावधानी महापुरुषाचे अनंतचतुर्दशी शके १९४१ (गुरुवार, १२ सप्टेंबर २०१९) ते अनंतचतुर्दशी शके १९४२ (मंगळवार, ०१ सप्टेंबर २०२०) या दरम्यान जन्मशताब्दीचे वर्ष असल्याने आपल्या परिवारसाठी फार महत्वाचे वर्ष आहे. हे वर्ष विविध उपक्रमाद्वारे मोठ्या प्रमाणात साजरे करण्याचा श्री दासगणू परिवाराने निश्चय केला आहे. सद्गुरुंच्या या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरहि आपल्या परंपरेनुसार कीर्तने, पारायणे, व्याख्याने, परिसंवाद व इतर अनेक कार्यक्रम होणार आहेत.

या सर्व कार्यक्रमांचा तपशील खाली उपलब्ध केला आहे.

या अपूर्व संधीचा जास्तीत जास्त जिज्ञासूं, तरुण व भाविकांनी लाभ घेऊन या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, ही विनंती.

सद्गुरू स्वामी वरदानंद भारती यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध विषयांवर खालील नामांकित वक्त्यांची उद्बोधक व्याख्याने गोरटे येथे आयोजित केली आहेत. व्याख्यानांचा तपशील पाहण्यासाठी खालील link वर click करा.

 व्याख्याने

सद्गुरू स्वामी वरदानंद भारती यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर आपल्या परंपरेनुसार कीर्तने, पारायणे, व्याख्याने, परिसंवाद व इतर अनेक कार्यक्रम होणार आहेत. शिबिरांचा तपशील पाहण्यासाठी खालील link वर click करा.

शिबिरे

सद्गुरू स्वामी वरदानंद भारती यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त गोरटे येथे पारायणे आयोजित केली आहेत. परायणांचा तपशील पाहण्यासाठी खालील link वर click करा.

पारायणे

सद्गुरू स्वामी वरदानंद भारती यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांची छायाचित्रे पाहण्यासाठी खालील link वर click करा.

चित्रदालन

=0=0=0=