ॐ श्री 卐

ll श्रीशंकर ll

‘नर अगर करणी करें तो नर का नारायण हो जाय’ या उक्ती प्रमाणे नराचा नारायण कसा होऊ शकतो याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे पू. अप्पांचे जीवन ! तरुण वयात नास्तिकतेकडे झुकलेले पू. अप्पा पुढे नंतर आस्तिकतेचे केवळ खंदे पुरस्कर्तेच झाले असे नाही तर साधकांसाठी दीपस्तंभ झाले. जीवनातील प्रत्येक चढउताराला स्थितप्रज्ञभावाने सामोरे जात, अत्यंत रसिकतेने जीवनाचा आस्वाद घेत, सामान्य जनांप्रमाणे प्रवृत्तीपर आयुष्य जगत असताना अविरत प्रयत्न व निष्ठापूर्वक सातत्य यांची कास धरून सद्गुरू कृपेने निवृत्तीपर जीवनाचा कळसाध्याय कसा गाठता येतो याचे मूर्तिमंत उदाहरण पू. अप्पांनी समाजापुढे प्रस्तुत केले आहे. अशा या विभूतीच्या जीवन चरित्राचा आरसा म्हणजे “तेजाचं चांदणं” हा ग्रंथ. पू. अप्पांच्या चरित्र ग्रंथाला दिलेले “तेजाचं चांदणं” हे नांव अगदी यतार्थ आहे ! पू. अप्पांचे जीवन म्हणजे प्रखर तेज आहे खरे पण ते तेज ‘तापहीन’ आहे. या ‘तेजीनिधी’ची शीतलता अनुभवायची असल्यास या ग्रंथाच्या सान्निध्यात जायला हवे. आपले स्वतःचे जीवन कृतार्थपूर्वक समाधानाने, अपार आनंदाने व अलौकिक समृद्धीने भरून टाकायचे असल्यास पू. अप्पांनी आयुष्यभर निष्ठापूर्वक जपलेली नीतिमूल्ये आपल्या जीवनात उतरविली पाहिजेत. यासाठी त्यांचा चरित्रग्रंथ सखोलपणे अभ्यासला पाहिजे.

पू. अप्पांच्या जन्मशताब्दी वर्षाचे निमित्त साधून पुण्यातील एक सद्गृहस्थ श्री. सतीश निरंतर यांनी स्वतः पुढाकार घेवून आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे पू. अप्पांचा हा चरित्र ग्रंथ सार रूपात चित्रफितीद्वारे (video clip) उपलब्ध करून देण्याचा अत्यंत स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे पू. अप्पांचा चरित्र ग्रंथ दृकश्राव्य अशा एका वेगळ्या स्वरूपात उपलब्ध होत आहे. या साठी श्री. सतीश निरंतर यांचे अभिनंदन !

श्री. सतीश निरंतर तयार करीत असलेल्या चित्रफिती त्यांच्याच सौजन्याने या संकेतस्थळावर उपलब्ध केल्या आहेत. जिज्ञासूंनी याचा अवश्य लाभ घ्यावा.

चित्रफितीत समावेश असलेल्या विषयांचा / प्रसंगांचा आढावा व प्रत्येक चित्रफितीचा कालावधी खाली दिला आहे.

अ. क्र. विषय कालावधी (मिनिटात)
१) प्रारंभिक निवेदन व चरित्र आढावा २४.४९
२) पूर्व पिठीका / जन्म / गोदार्पण सोहळा / बालपण / ब्रह्मचर्याश्रम २२.०१
३) कीर्तनाचा ओनामा १५.४२
४) अनुग्रह व आयुर्वेद महाविद्यालय, पुणे ८.३८
५) स्वतःचे परीक्षण “मी”
१४.२२
६) गृहस्थाश्रमारंभ / मुंबईचे कीर्तन
९.५०
७) श्री न. चिं. केळकर / श्री दिनकर (मामा) देशपांडे / श्रीकृष्णकथामृत लेखन
११.२६
८) छात्रबोध
१३.०२
९) श्रीदासगणू महाराज चरित्र लिखाण व प्रकाशन / गोरट्याला पांडुरंग व शनिदेव स्थापना
१२.१५
१०) नोकरीचे त्यागपत्र / ती.दादांचे निर्याण
११.०८
११) श्रीसोनुमामा दांडेकर / समाधी मंदिराचे भूमिपूजन / योगतारावली
९.५४
१२) श्रीनारायण दर्शनाची ओढ
८.००
१३) सतोपथ यात्रा
१२.२३
१४) श्रीराजेश्वरशास्त्री द्रविड / अनुवाद ज्ञानेश्वरी लिखाण
१५.०९
१५) दक्षिण भारत प्रवास / महाभारताचे वास्तव दर्शन
८.०४
१६) श्रीवरदनारायण दर्शन
२०.४१
१७) नांदेड ते पंढरपूर पदयात्रा
६.२९
१८) श्री वा. ना. उत्पात / साधकोपदेश
१५.३७
१९) अनुग्रहितांना मार्गदर्शन / वाटा आपल्या हिताच्या
१६.३८
२०) मनोबोध / उत्सवांचे धोरण व प्रयोजन
१०.०७
२१) श्रीधुंडामहाराज / सिंधु स्नान
१०.५२
२२) ब्रम्हसूत्रभाष्य लिखाण / बदरीनाथ प्रसंग
१४.३६
२३) वानप्रस्थाश्रमाकडे
९.१९
२४)
कैलास-मानस यात्रा १९.५६
२५) गंगोत्री / मॅजेस्टिक प्रकाशन आयोजित गच्चीवरील गप्पा / श्रीविष्णुसहस्रनाम सार्थ
५.५७
२६) उपनिषद लेखन / शृंगेरी
६.१७
२७) पुन्हा एकदा सिंधु स्नान / देगलूर
४.५८
२८) अनुबोध पटाची निर्मिती
८.३९
२९)
श्री दासगणू महाराज – महाराष्ट्र शासन निर्मित अनुबोधपट १७.४१
३०)
आळंदीच्या वैदिकांची गोरटे भेट / श्री.शंकर अभ्यंकर ७.४८
३१) अधिक मासातील प्रसंग / पू. अप्पांचा श्रद्धा भाव ५.०१
३२)
उपनिषद भाष्य ६.१९
३३)
वसुमती तथा गार्गी ताई यांची गुरुसेवा ६.५६
३४)
विद्यावाचस्पती परांजपे व प.पू.आप्पांचा पुत्रोपदेश ६. १३
३५)
प.पू.आप्पांची मानस भक्ती आणि परशुराम कुंड दर्शन ८. ५१
३६)    प.पू.आप्पांचे मानस सरोवराला पत्र व त्याचा प्रसाद ७. ३५
३७)
प.पू.आप्पांची कीर्तन सेवा व संन्यासाश्रम १४. १७
३८)
राजकीय मार्गदर्शन व मातोश्रींचे निधन ७. ४६
३९)   प.पू.आप्पांचे श्री वरदनारायण चित्र रेखाटन २०. ५९
४०)
बासरी ताईंचे गायन आणि नरु भाऊंचे मनोगत १२. ११
४१)
प.पू.आप्पांचा संन्यासाश्रम दिक्षाविधी १८. ३४
४२)
स्वामी उमानंदगिरी यांचे मनोगत ७. ४२
४३)
पूर्वरंग तरंग व तरंगिणी पुस्तकांचे लेखन ५. २६
४४)
संन्यस्थ अप्पांचे स्वागत,गुरुमंत्र,अजापाजप ८. १२
४५)  तपोवन यात्रा आणि श्री नारायणाचे सगुण दर्शन १९. ३१  
४६)
प.पू.अप्पांचा पंच्याहत्तरीतही प्रवासातील उत्साह १४. ०५
४७)  भावार्चना प्रकाशन,शास्त्रीजी शताब्दी महोत्सव १२. ५८  
४८) प.पू.अप्पांचे वाङ्मय विवेचन व पारमार्थिक उपदेश १३.१८
४९) नंदनवन व व्यासकुंड मोहीम, साधना मार्गदर्शन ०८.३८
५०) प.पू.अप्पांचे षहत्तरीनिमित्त मनोगत, खंत व निवेदन २०.५०
५१) प.पू.अप्पांचे नित्योपयोगी,साधना ग्रंथ मार्गदर्शन ०८.४६
५२) प.पू.अप्पांची आकाशवाणी प्रसारित प्रत्यक्ष मुलाखत ४०.३५
५३) आप्पाची कल्पकता व पूर्वीचे विनावकील न्यायासन ८.०९
५४) पांडुरंगशास्त्रींशी भेट व डॉ. असनानींची श्रद्धा ११.२७
५५) जीवेत: शरद: अनंतम, मनुस्मृति व आमनायाची रचना ११.१६
५६) मनुस्मृतिचे प्रकाशन व आप्पांचा गोरट्यास निरोप १२.४७
५७) आप्पांचे कारगिल गीत, सिंधू स्नान, गंगानमन १०.५६
५८) वरदनारायणाचा संकेत व आप्पांच्या मनाची घालमेल १५.३३
५९) मानसपूजा,साधना,शेवटची गोकुळाष्टमी, वेध वैकुंठाचे ७.३८
६०) आम्ही जातो आमुच्या गावा आमचा रामराम घ्यावा… २५.४८